सुस्वागतम!

राज्य मराठी विकास संस्थेचे स्वरूप आणि कार्य यांसंबंधीची माहिती सर्व जिज्ञासूंपर्यंत पोचविणाऱ्या संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत!

विविध क्षेत्रांत होणारा मराठीचा वापर अधिकाधिक गुणवत्तापूर्ण होत जावा यासाठी प्रयत्नशील राहावे व मराठी भाषेच्या अभिवृद्धीची प्रक्रिया नियोजनपूर्वक गतिमान करावी ही या संस्थेच्या स्थापनेमागील दोन मुख्य उद्दिष्टे आहेत. त्यांनुसार सर्व स्तरांवर मराठीचा विकास साधण्यासाठी संस्था स्वतंत्रपणे उपक्रम हाती घेते. भाषा व संस्कृतीच्या क्षेत्रांत मराठी भाषेच्या अभिवृद्धीसाठी काम करणाऱ्या विविध शासकीय व अशासकीय संस्थांमध्ये समन्वय राखून त्या संस्थांच्या साहाय्यानेही काही उपक्रम संस्था पार पाडते.
सूचना:
मराठी भाषा समाजाच्या तळापर्यंत रुजून सुदृढ व्हावी आणि सर्वांगाने बहरावी यासाठी आपले विचार, मते, सूचना आम्हाला जरूर कळवा. आपल्यातील सुसंवादातून मराठीच्या विकासाला गती मिळेल.
मराठी म्हणींवरून कथा लेखनाची स्पर्धा
राज्य मराठी विकास संस्था नेहमीच विविध स्पर्धांचे आयोजन करत असते. विद्यार्थ्यांसोबतच सर्वच वयोगटातील साहित्यिक आणि कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं काम राज्य मराठी विकास संस्था करत असते. समाजातील सर्वच स्तरांवरील व्यक्तींच्या कलागुणांना वाव देण्याच काम राज्य मराठी विकास संस्था सातत्यानं करत असते. त्याचाच एक भाग म्हणून मराठी म्हणींवरून कथा लेखनाची स्पर्धा आयोजित करत आहोत.
राम गणेश गडकरी स्मृतिशताब्दी आणि गदिमा-पुल जन्मशताब्दीनिमित्त काव्यवाचन व एकपात्री अभिनय स्पर्धा
राम गणेश गडकरी स्मृतिशताब्दी आणि गदिमा-पुल जन्मशताब्दी
२०१८-१९ हे वर्ष कवी, विनोदी लेखक आणि नाटककार रामगणेश गडकरी यांचे स्मृतिशिाब्दी वर्ष, तर महाकवी ग.दि. माडगुळकर आणि सुप्रसिद्ध लेखक पु. ल. देशपांडे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. यानिमित्ताने राज्य मराठी विकास संस्था या साहित्यिकांच्या लेखनावर आधारित, राज्य पातळीवर एकपात्री अभिनय स्पर्धा तसेच काव्यवाचन स्पर्धा आयोजित करत आहे आहे.
स्पर्धेसाठी जिल्हासमन्वयकांची यादी:
यादी क्र. १ | यादी क्र. २ | यादी क्र. ३ | यादी क्र. ४
दोन्ही स्पर्धांबद्दल अधिक माहिती
स्वरूप, नियमावली व प्रवेश अर्ज नमुना

अमराठी भाषकांसाठी अध्यापनवर्ग - मराठीचा वेलू गेला अटकेपार!
इस्राईलमधील तेल अवीव विद्यापीठात राज्य मराठी विकास संस्थेने चालवले मराठीचे वर्ग. दि. १ जुलै ते ३ ऑगस्ट २०१६ दरम्यान तेल अवीव विद्यापीठातील २६ विद्यार्थ्यांना दिले मराठी बोलण्याचे प्रशिक्षण. या वर्गाची ही काही क्षणचित्रे:

जाहिरात आणि आवाहने

  • महाराष्ट्रातील मराठी भाषा आणि साहित्य संशोधन संस्थांना अनुदान (लवकरच..)
  • संगणक आणि मराठी (लवकरच..)
  •  
horizontal divider

संस्थेची प्रकाशने


पार्थ घोष व इतर
मूल्य १५५

वासुदेव बळवंत पटवर्धन
मूल्य- ३७६

गीता भागवत
मूल्य २७५ रुपये

लीला पाटील
मूल्य - १५०

डॉ. वसंत जोशी
मूल्य २७५ रुपये

गीता भागवत
मूल्य २७५ रुपये

डॉ. भीमाशंकर देशपांडे
मूल्य - १५०
प्रकाशनांची संपूर्ण सूची
horizontal divider
horizontal divider